Multibagger Shares : गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर ! 3 वर्षात ₹ 1 लाखांचे झाले ₹ 22 लाख; आता स्टॉक स्प्लिटची तयारी…
तिरुपती टायर्सच्या शेअर्सने गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 2,100% पेक्षा जास्त उत्कृष्ट मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

Multibagger Shares : शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगला नफा कमवणे अनेकांचे स्वप्न असते. अशा वेळी जर तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर नक्कीच तुम्हाला चांगला रिटर्न मिळू शकतो.
दरम्यान, जर तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला अशा शेअरबद्दल सांगणार आहे ज्याने काही वर्षातच त्याच्या गुंतवणूकदारांना लाखो रुपयांनाच रिटर्न दिला आहे.
आज आम्ही तुम्हाला तिरुपती टायर्सच्या शेअरबद्दल सांगणार आहे. या शेअर्सने गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 2,100% पेक्षा जास्त उत्कृष्ट मल्टीबॅगर परतावा दिला आहे. आता कंपनी आपल्या शेअर्सचे म्हणजेच स्टॉक स्प्लिटचा विचार करत आहे.
कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या माहितीत सांगितले की, येत्या गुरुवार, 27 जुलै रोजी त्यांच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मंडळ अनेक प्रस्तावांवर विचार करणार आहे. यापैकी एक ऑफर म्हणजे शेअर्सचे विभाजन म्हणजेच स्टॉक स्प्लिट करणे.
तिरुपती टायर्सने स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की 27 जुलै रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत समभागांच्या विभाजनाचा विचार केला जाईल आणि त्याला मंजुरी दिली जाईल. याशिवाय भागभांडवल वाढवण्यासाठी कंपनीच्या मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये आवश्यक बदलांनाही मान्यता दिली जाईल.
तिरुपती टायर्स लिमिटेड ही कंपनी ऑटोमोबाईल पार्ट्स विकते. कंपनी सायकल, ट्रायसायकल, मोपेड, स्कूटर, मोटारसायकल, ऑटो रिक्षा, ट्रॅक्टर, ट्रक आणि बस इत्यादींसाठी टायर आणि ट्यूब विकते. तिरुपती टायर्स ही कंपणी भारतात कार्यरत आहेत.
दरम्यान या कंपणीचा हा मल्टीबॅगर स्टॉक आहे, ज्याने गेल्या 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये 22 लाख रुपये केले आहेत. शुक्रवारी, 22 जुलै रोजी कंपनीचे शेअर्स 1.10 टक्क्यांनी वाढून 38.50 रुपयांवर बंद झाले आहे.
तथापि, आजपासून 3 वर्षांपूर्वी, 21 जुलै 2020 रोजी, त्याचे शेअर्स BSE वर अवघ्या 1.71 रुपयांवर व्यवहार करत होते. अशाप्रकारे, गेल्या 3 वर्षांत, या समभागाने गुंतवणूकदारांना सुमारे 2,150% रिटर्न दिला आहे.