ताज्या बातम्या

Multibagger Stocks List : नशीब बदलून टाकणारे शेअर्स ! गुंतवणूकदारांचे काही दिवसातच 4 पटीने वाढवले ​​पैसे, जाणून घ्या यादी

मजबूत फंडामेंटल्स असलेल्या काही स्मॉलकॅप शेअरने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. यापैकी काही गुंतवणूकदारांचे पैसे एका वर्षातच 4 पटीने वाढले आहेत.

Multibagger Stocks List : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. मात्र अनेकजण योग्य ठिकाणी माहितीपूर्वक गुंतवणूक करत नाहीत त्यामुळे त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो.

त्यामुळे जर तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा 7 शेअर्सबद्दल सांगणार आहे, ज्यांनी गुंतवणूकदारांना काही दिवसातच श्रीमंत केले आहे. या शेअर्सने 2022-23 या आर्थिक वर्षात जबरदस्त रिटर्न दिला आहे.

या शेअर्सच्या यादीत सोम डिस्टिलरीजचा शेअर पहिल्या क्रमांकावर आहे. प्रसिद्ध गुंतवणूकदार डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या या स्टॉकने एका वर्षात 290% परतावा दिला आहे. आजही इंट्राडे मध्ये हा शेअर NSE वर ग्रीन चिन्हात 247.30 रुपयांवर व्यवहार करत होता.

यानंतर पॅकेजिंग फर्म एरो ग्रीनटेकचा स्टॉक येतो. या स्टॉकने देखील गेल्या एक वर्षापासून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. एका वर्षात स्टॉकमध्ये सुमारे 297 टक्क्यांची वाढ झाली आहे. आजही हा शेअर 2.86 टक्क्यांच्या वाढीसह 356.10 रुपयांवर व्यवहार करत आहे.

मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या समभागांमध्ये कामत हॉटेल्सच्या शेअरचे नाव देखील समाविष्ट आहे. या शेअरने एका वर्षात 287 टक्क्यांनी झेप घेतली आहे. गेल्या सहा महिन्यांत स्टॉक 106 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, 2023 सालापर्यंत या समभागाने गुंतवणूकदारांना 113 टक्के नफा दिला आहे.

Magicaaworld Entertainment Limited च्या शेअरने देखील वर्षभरात गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. एका वर्षात हा शेअर NSE वर 203 टक्क्यांनी वाढला आहे. काल म्हणजेच बुधवार, 14 जून रोजी हा शेअर इंट्राडे मध्ये रु. 42.50 वर ट्रेडिंग करत होता.

Ujjivan Financial Services चा शेअर आज एनएसईवर 1.77 टक्क्यांनी घसरून 390.80 रुपयांवर व्यवहार करत असला तरी गेल्या वर्षभरात त्याने गुंतवणूकदारांचे नशीब बदलून टाकले आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना 196% परतावा दिला आहे.

सेंटम इलेक्ट्रॉनिक्सच्या (Centum Electronics) शेअर्सनेही गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांच्या पैशात जवळपास चारपट वाढ केली आहे. या कालावधीत स्टॉक सुमारे 183 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या एका महिन्यातच हा शेअर 53 टक्क्यांनी वधारला आहे. आज, इंट्राडेमध्ये सुमारे 4 टक्क्यांनी घसरून शेअर 1,185 रुपयांवर व्यवहार करत आहे.

Tuticorin Alkali Chemicals and Fertilizers हा शेअर एका वर्षात 129 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या एका महिन्यात हा शेअर जवळपास 22 टक्क्यांनी वाढला आहे.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button