Multibagger Stocks : या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले वेडे ! फक्त 10 हजारांत दिले 2 लाख रुपये; सविस्तर जाणून घ्या
या स्टॉकने गुंतवणूकदारांना फक्त 10 हजारांत 2 लाख रुपये दिले आहेत. यामध्ये गेल्या सहा महिन्यांत 64 टक्क्यांहून अधिक उडी घेतली आहे.

Multibagger Stocks : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका अशा शेअरबद्दल सांगणार आहे ज्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
हा मल्टीबॅगर स्टॉक FMCG क्षेत्रातील आहे, ज्याने अल्पावधीतच गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. या स्टॉकने 10 हजार रुपयांचे 2 लाख केले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना खूप मोठा लाभ मिळाला आहे.
एलटी फूडच्या शेअर्सनी गेल्या 10 वर्षात आश्चर्यकारक परतावा दिला आहे. हा स्टॉक जवळपास 2000 टक्क्यांनी वाढला आहे आणि या काळात गुंतवणूकदारांना मोठा नफा झाला आहे.
हा शेअर तीन वर्षांत 495 टक्क्यांनी वाढला आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 10 हजार रुपये गुंतवले असते तर आज त्याला 2 लाख रुपये मिळाले असते.
कंपनी कोणत्या ब्रँडखाली तांदूळ विकते?
LT Food ही ग्राहक खाद्य क्षेत्रातील FMCG कंपनी आहे. तांदूळ आणि तांदूळ-आधारित खाद्य व्यवसायात ही जागतिक स्तरावर आघाडीची कंपनी आहे. कंपनीचा फ्लॅगशिप ब्रँड ‘दावत’ आहे, जो भारतात बासमती तांदूळ तयार करतो, तर ‘रॉयल’ ब्रँड उत्तर अमेरिकेला बासमती तांदूळ पुरवतो.
कंपनीचा शेअरहोल्डिंग पॅटर्न
कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे झाल्यास, प्रवर्तकांचा त्यात 51 टक्के शेअर आहे, तर सार्वजनिक शेअरहोल्डिंग 49 टक्के आहे. म्युच्युअल फंडांसाठी, शेअर 2.84 टक्के आहे आणि विदेशी शेअर 5.93 टक्के आहे. तर या कंपनीत 16.13 टक्के शेअर आहे.
कंपनीची कमाई कशी झाली?
जर या कंपनीच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, जूनमध्ये, एलटी फूडचा एकूण महसूल वार्षिक 10 टक्क्यांनी वाढून 1,789 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा भारतातील बाजारातील शेअर 29.8 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 210 bps अधिक आहे.
चालू स्टॉक स्थिती जाणून घ्या
या शेअरने गेल्या सहा महिन्यांत 64 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर, हा शेअर एका महिन्यात 10.24 टक्क्यांनी घसरला आहे आणि अजूनही घसरण सुरूच आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 2.61 टक्क्यांनी घसरून 158.30 रुपयांवर बंद झाला आहे.