मनपा आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना इशारा…कामकुचराई केल्यास

Ahmednagar News : शहरात कचऱ्याचे स्वच्छतेबाबतच्या डायरीमध्ये कुठलीही साचलेले ढौग, रोज नियमित न येणारी घंटागाडी व नागरिकांच्या विविध तक्रारी याबाबत महापालिकेच्या महासभेत पदाधिकारी व नगरसेवक यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
या पाश्वंभूमीवर मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी अधिकारी, कर्मचारी व कचरा संकलन करणारे ठेकेदार यांची बैठक घेत कामात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच कामात हलगर्जीपणा केल्यास अधिकारी व कर्मचारी तसेच ठेकेदार एजन्सीवर देखील दंडात्मक कारवाई केली जाईल,
तसेच खातेनिहाय चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल. असेही डॉ.जावळे म्हणाले. स्वच्छत्याच्या बाबतीत डायरीत कोणतीही नोंद नसल्यामुळे १ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येईल असे सूचित केले.
शहरातील खानावळ व हॉटेल यांचा दररोजचा कचरा रस्त्यावर टाकला जातो हा रस्ता घंटा गाडीतच हि टाकला जावा, अन्यथा ग्र संबंधित हॉटेलवर कारवाई करण्याबाबतच्या सूचना मनपा आयुक्त जावळे यांनी दिल्या.
तसेच आता घंटागाडीवर लक्ष ठेवण्यासाठी मनपाच्या वतीने डिजिटल प्रणाली कार्यान्वित केली असून येत्या मंगळवारी डिजिटल प्रणालीद्वारे घंटागाडीवर नजर ठेवली जाणार आहे. शहरात दररोज केलेल्या स्वच्छतेच्या कामाचा अहवाल आता संबंधितांनी सादर करणे बंधनकारक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.