अहमदनगर

मनपाचे कर्मचारी म्हणत घरात घुसले अन् आठ तोळे चोरले

अहमदनगर- महापालिकेचे कर्मचारी आहोत, असे म्हणून घरात घुसलेल्या चार ते पाच जणांनी वृध्द दांपत्यांकडील आठ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. केडगाव उपनगरातील अमितनगर भागात दुपारच्या वेळी ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तुमच्या घराभोवती मच्छर खूप झालेले आहेत. आम्ही महापालिकेचे कर्मचारी आहोत. तुमच्या घराची सफाई करण्यासाठी आलो आहोत, असा बनाव करून चार-पाच चोरटे विश्‍वनाथ एकनाथ राजगुरू (वय 90) यांच्या घरी आले. त्यांनी फवारणीचा बनाव केला. काहींनी घरात घुसून सोन्याचे दागिने चोरले.

 

यामध्ये चार तोळ्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याची चेन, प्रत्येकी अर्धा ग्रॅमच्या दोन अंगठ्या, एक तोळ्याचे कानातील झुमके, अर्धा ग्रॅमच्या कानातील पळ्या असे एकुण आठ तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून हे चोरटे साडेअकरा वाजता घरातून निघून गेले. राजगुरू यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात ही चोरी झाल्याचे सायंकाळी लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चार-पाच चोरट्यांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button