लेटेस्ट

दारू पिल्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून दगडाने ठेचून केला खून

लॉकडाऊन उघडताच नगर शहरासह जिल्ह्यात खून आणि हाणामारीचे प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. शहरातील नेप्ती नाका परिसरात बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एकाचा दगडाने खून करण्यात आला.

हा खून दारू पिल्यानंतर तिघा मित्रांत झालेल्या किरकोळ वादातून झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली. राष्ट्रीय किक बॉक्सिंग खेळाडू संकेत चव्हाण याच्यावर गावठी काट्यातून झालेल्या गोळीबाराला एक दिवस उलटत नाही, तोच नगर शहरातील नेप्ती नाकाचौकात एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, खून झाल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.

पोलिस मात्र उशिराने पोहोचले. तिघे मित्र दारू पिल्यानंतर त्यांच्यात किरकोळ वाद झाले. त्यातूनच हा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button