अहमदनगर

अहमदनगर जिल्हा हादरला ! रस्त्यात आडवुन तरुणाचा खून…

अकोले तालुक्यातील पांभुळवंडी येथील योगेश भास्कर भालेराव (वय 27)हा शेंडीला जात असताना त्याला रस्त्यात आडवुन दोघानी देवगाव शिवारात मारुन टाकल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

आदिवासी भागातील पाभुळवंडी येथे दि.4 एप्रिल रोजी सायकाळी रमेश जाधव व त्याच्या नातेवाईकासमवेत भांडणे झाली असुन त्याला मारल्याचे सागितले.

तर रमेश जाधव हा घरासमोर येऊन पुन्हा योगेश बाहेर ये तुला दाखवतो. तुझा मुडदा पाडतो असे म्हणुन वाईट-साईट शिविगाळ करुन निघुन गेला.

तर दि.5 एप्रिल रोजी सकाळी घरातून पिवळ्या रंगाची स्कुटी घेऊन योगेश भालेराव हा शेंडीला कामानिमित्त गेला होता.तर काही वेळेने निरोप घेऊन असता तुमचा मुलगा देवगावच्या झाडाखाली पडल्याची माहिती भांगरे यांनी दिली.

तर योगेश भास्कर भालेराव (वय 27) हा शेंडीला जात असताना त्याला रस्त्यात आडवुन रमेश दत्तु जाधव व मधुकर दत्तु जाधव यांनी देवगाव शिवारात मारुन टाकल्याची फिर्याद राजूर पोलिस स्टेशनला मयत मुलाचे वडील भास्कर संतु भालेराव यांनी दिल्यावरुन राजूर पोलिसांत भा.द.वि.कलम 302,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button