अहमदनगर

युवकाचा खुन; दोघांना सात दिवस कोठडी

अहमदनगर- पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याच्या रागातून युवकाचा दोरीने गळा आवळून खून करणार्‍या दोघांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. हनुमंत नरसू गायकवाड (वय 24) आणि सुरज लक्ष्मण मोरे (वय 22, दोघे रा. बाबुर्डी घुमट) अशी आरोपींची नावे आहे. त्यांनी चास (ता. नगर) शिवारात राहुल कनका मोरे (वय 19 रा. बाबुर्डी घुमट ता. नगर) या युवकाचा खून केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत.

मंगळवार दुपारी हनुमंत आणि सुरज यांचे राहुलसोबत वाद झाले होते. यावेळी राहुलने सुरज मोरे याच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरले. या रागातून हनुमंत आणि सुरज यांनी दोरीने गळा आवळून राहुलचा खून केला. यानंतर राहुलचा मृतदेह त्याठिकाणीच ठेवला होता.

बुधवारी सकाळीच हनुमंत गायकवाड याने शहरातील कोतवाली पोलीस ठाणे गाठत खून केला असल्याची माहिती दिली. यानंतर खूनाच्या घटनेचा उलगडा झाला होता. कोतवाली व नगर तालुका पोलिसांनी हनुमंतसह सुरजला ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत राहुलचे वडिल कनका भिमा मोरे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींना अटक करून गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तपासकामी सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button