अहमदनगर

मित्राचा वाढदिवस पडला महागात… बर्थडे बॉयसह मित्राची रवानगी तुरुंगात

एका तरुणाने आपल्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापून साजरा केला. याबाबतची माहिती मिळताच वाढदिवस साजरा करणारा तरुण व ज्याची तलवार आहे तो तरुण अशा दोघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. दरम्यान हा प्रकार श्रीरामपूर शहरात घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, श्रीरामपूर शहर पोलीस पथक शहरात गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे यांना माहिती मिळाली की, सोशल मीडिया व्हाट्सअप ग्रुपवर एकजण तलवारीने केक कापत असताना दिसत होता. याबाबतची माहिती घेतली असता शहरातील लक्ष्मीनारायणनगर परिसरात हा प्रकार घडतो आहे असे समजले.

ऋषिकेश सुनील गडाख असे या तरुणाचे नाव असल्याचे समजताच पोलिसांनी ऋषीकेश गडाख याच्या घरी जावून या व्हीडिओबाबतची विचारपूस केली असता ही तलवार माझ्या वाढदिवसाला माझा मित्र प्रशांत शिवाजी भोसले (रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर) याने आणली होती अशी माहिती दिली.

त्यानुसार पोलीस ऋषिकेश गडाख याला घेऊन प्रशांत भोसले याच्या घरी गेले व त्याचा घरून सदर तलवार जप्त केली आहे. भोसले याने विनापरवाना बेकायदेशीररित्या तलवार बाळगतांना आढळून आला व त्याचा मित्र ऋषिकेश सुनील गडाख याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापला असून या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button