लेटेस्ट

नगरकरांनी पुन्हा एकदा राज्यात अव्वल क्रमांक गाठला

कोरोना लॉकडाउन नियमांचे उल्लंघन करण्यात नगरकरांनी पुन्हा एकदा राज्यात अव्वल क्रमांक गाठला. मागील लॉकडाऊनमध्ये २६ हजार नागरिकांनी नियम मोडले.

या लॉकडाऊनमध्ये तब्बल १ लाख ४८ हजार नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केले. पोलिसांनी त्यांच्याकडून ४ कोटी ३४ लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांनी धडक कारवाईची मोहीम हाती घेतली होती. पोलिसांनी १२७८ वाहने जप्त केली आहेत. जिल्हाभरातील ८६६ जणांना तात्पुरते ताब्यात घेण्यात आले होते.

२६३ जणांना १८८ कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटिसाही बजावल्या आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. ६४७२ जणांवर विनामास्क फिरल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.

सोशल डिस्टंन्सिंगते उल्लंघन केल्याप्रकरणी २८५२, संचारबंदीचे उल्लंघनप्रकरणी ३२११, तर बेकायदेशीरपणे दुकाने चालू ठेवल्याप्रकरणी ५७८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button