‘त्या’ गोळीबार प्रकरणी चौघांची नावे समोर; गुन्हा दाखल

अहमदनगर- नेवासा फाटा येथे काल सायंकाळी झालेल्या गोळीबार प्रकरणी चौघांची नावे समोर आली आहेत. त्यांच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आकाश पोपट कुसळकर (वय 20) यांनी फिर्याद दिली आहे. अनिल चव्हाण, मयूर वाघ, ज्ञानेश्वर दहातोंडे व अन्य एक अनोळखी इसम या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
नेवासा ते नेवासा फाटा दरम्यान सेंट मेरी स्कूल रोड समोर काल सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान तीन जण नेवासा फाट्याकडून दुचाकीवर आले. सेंट मेरी स्कूल समोरील रोडवर आल्यानंतर दुचाकी थांबवत एकाने हवेत तीन गोळीबार केले. तर दुचाकीवरील दुसऱ्याने दुकानासमोर उभ्या असलेल्या एका तरूणाच्या डोक्यात काचेची बाटली मारली.
डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला नेवासाफाटा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गोळीबार व मारहाण प्रकरणी रात्री उशिरा दाखल फिर्यादीवरून चौघांवर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.