अहमदनगरताज्या बातम्या

राष्ट्रवादी नेत्याची हातात दगड घेऊन नगरचे नेते आणि कुकडीच्या अधिकार्‍यांना…

येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्याद्वारे पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा तालुक्यासाठी उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यासाठी 9 मे ला पुणे येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक झाली.

यावेळी आमदार अशोक पवार, अतुल बेनके, रोहित पवार, माजी मंत्री राम शिंदे, कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता संभाजी माने, कालवा सल्लागार समितीचे सदस्य अशोक घोडके आदी उपस्थित होते.

दरम्यान कुकडीच्या पाण्यावरून जुन्नरमध्ये राजकीय वातावरण गरम होण्याची शक्यता दिसतेय. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी थेट माणिकडोह धरण क्षेत्रावर जाऊन नगरच्या नेत्यांना आणि कुकडी प्रकल्पाच्या अधिकार्‍यांना आपली आगळ्या वेगळ्या शैलीत तंबी दिली आहे.

Advertisement

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून आक्रमक लांडे यांनी हातात दगड घेऊन अधिकारी आणि सत्तेतील नेत्यांची डोके फोडण्याची भाषा वापरली असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

नगर व सोलापूर या 3 जिल्ह्यांना व 7 तालुक्यांसाठी महत्वाचा असलेल्या 5 धरणांचा समूह असलेल्या कुकडी प्रकल्पात फक्त 21 टक्के पाणीसाठा आहे. अशात हवामान खात्याने यंदा पाऊस उशीरा असल्याचं सांगूनही नगर जिल्ह्यातील काही मंत्री व राजकीय नेते दबाव वापरून पाणी पळवणार असल्याचं बोललं जात आहे.

नुकतीच पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक झाली आणि पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाविरोधात आज जुन्नर तहसील कार्यालयापुढे सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन सुद्धा केले.

Advertisement

मात्र, देवराम लांडे यांच्या या व्हिडीओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. कुकडी प्रकल्पा अंतर्गत असलेल्या 5 धरणांपैकी पिंपळगाव जोगे धरणाच्या मृत साठ्यातील व माणिकडोह धरणातील साडेतीन टीएमसी पाणी येडगाव धरणात सोडून 22 मे 2023 पासून कुकडी डावा कालव्यात 30 दिवसांचे उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. मात्र, त्या आधीच कुकडीचे पाणी पेटले आहे.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button