राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ‘या’ दिवशी जिल्हा दौऱ्यावर येणार

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मंगळवार दि. 19 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्हा दौर्यावर येणार आहे. सुप्रिया सुळे या नगर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 8 वाजता येणार आहे.
त्यानंतर सुळे आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयामध्ये साडेनऊ वाजता चार्टर अकाउंटंन संघटनेची बैठक घेणार आहेत. त्यानंतर साडेदहाच्या सुमारास रयत शिक्षण संस्थेच्या जिल्हा कार्यालयात चव्हाण सेंटर व यशस्विनी अभियान बैठकीचे आयोजन केले आहे.
त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास आदेश चंगेडिया यांच्या घरी राखीव, दुपारी पावणे दोनच्या सुमारास हातमपूर येथील वास्तु संग्रहालयास भेट देणार आहे.
नंतर अडीचच्या सुमारास राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शहर पदाधिकार्यांचा संवाद, साडेतीनच्या सुमारास ग्रामीण पदाधिकार्यांचा संवाद तर पाचच्या सुमारास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.