Saturday, February 24, 2024
Homeसरकारी योजनादुधासाठी अनुदान हवे? तर मग 'हे' करा, मंत्री राधाकृष्ण विखे यांचे महत्वपूर्ण...

दुधासाठी अनुदान हवे? तर मग ‘हे’ करा, मंत्री राधाकृष्ण विखे यांचे महत्वपूर्ण निर्देश

दुधाचे भाव कमी झाल्याने शेतकरी संतप्त होत रत्यावर उतरला होता. त्यामुळे शासनाने दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले. सुरवातीला सहकारी संस्थांपुरतेच मर्यादित असणारे अनुदान नंतर सरसकट करण्यात आले.

आता या दूध अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी असे स्पष्ट निर्देश राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शासनाने जाहीर केलेले अनुदान दूध उत्पादक मिळण्यासाठी त्यांचे टॅगींग होणे गरजेचे आहे. त्यामुळे पशुधनाचे प्रॉपर टॅगींग व्हावे म्हणजे सर्वांना अनुदानाचा लाभ मिळेल अशा सूचना विखे यांनी दिल्या आहेत.

राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले आहे.

या दूध अनुदानबाबत मंत्री विखे पाटील यांनी बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे एका बैठकीत आढावा घेतला. दूध अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

शासनाकडून मिळणारे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे यासाठी त्यांच्या पशुधनाचे टॅगींग होणे महत्त्वाचे आहे. हे काम अचूकरित्या पूर्ण झाले तरच सर्वांना अनुदानाचा लाभ मिळेल असेही विखे म्हणले.

या बैठकीस पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे, आयुक्त प्रशांत मोहड, सहा निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) शहाजी पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सध्या शेतकऱ्यांना चाऱ्याचा व खुराकाचा खर्च अमाप येत आहे. त्यामानाने दुधाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी तोट्यात आला आहे. शेतकऱ्यांनी याबाबत संताप व्यक्त केल्यानंतर सरकारने दुधाला अनुदान जाहीर केले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments