अहमदनगरताज्या बातम्या

दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांकरीता नवीन वाहन मालिका सुरू

दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांकरीता नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत असून इच्छुक अर्जदारांनी दि. ३० मे, २०२३ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.३० वाजे पर्यंत पसंती क्रमांकाच्या विहीत शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज चांदणी चौकातील नवीन इमारतीत खिडकी १४ येथे जमा करावेत.

वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांचा पत्त्याचा पुरावा, पॅनकार्ड जोडावे. अर्जामध्ये वाहन ज्या व्यक्तीच्या नावे आहे त्या व्यक्तीचा आधार कार्डला सलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक डिमांड ड्राफ्ट अहमदनगर कॅम्प ब्रँच ट्रेझरी ब्रँच कोड नं १३२९६ करीता देव असावा,

अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज आला असेल त्यांची व एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले असतील त्यांच्या पसंती क्रमांकाची यादी दि. ३० मे, २०२३ रोजी सायं. ५.०० वाजता चांदणी चौकातील नवीन इमारतीत नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल.

एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोन जास्त अर्ज आलेल्या यादीमधील पसंतीक्रमांसाठी ज्यांनी अर्ज केला आहे अशाच अर्जदारांनी दि. ३१ मे,२०२३ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठी पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सिलबंद करून आस्थापना विभागात जमा करावा.

एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन सिलबंद लिफाफ्यात सादर केलेल्या जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट धारकांनी दि. ३१ मे, २०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे दालनात उपस्थित रहावे.

लिलावासाठी उपस्थित राहणा-या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकार पत्रासह हजर रहावे. कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील.

ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदानांना परत देण्यात येईल.

तसेच विहीत वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठलाही प्रकारचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button