अहमदनगर

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; कापूस, कांदा व सोयाबीनच्या दरात घट

अहमदनगर- ग्रामीण भागातील शेतकरी सध्या कापूस, कांदा व सोयाबीन पिकांच्या भरवशावर अवलंबून आहे. त्यात रब्बी हंगामात पिकें उभी करण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसे नाही. म्हणून आपल्या जवळील असणारे सोयाबीन, कपाशी व कांदा मार्केटमध्ये विकून पैसा उपलब्ध करताना दिसत आहे.पण दर कोसळल्याने शेतकर्‍यांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहे.

 

सध्या कापूस, कांदा व सोयाबीनचे दर कमी झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला असून त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

 

मागील पंधरवड्यात कांद्याला प्रति क्विंटलला तीन ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. त्याच कांद्याला आता मार्केटमध्ये दीड ते दोन हजारांवर आले आहेत. म्हणजे भावात निम्म्याने घट झाली आहे. बाहेरील काही मार्केट मध्ये शेतकर्‍यांनी कांदा लिलाव बंद पाडून आवाज देखील उठविला होता. त्यानंतर सोयाबीनचे दर देखील सहा हजार तीनशे रुपये भाव मिळाला होता. त्यात आता पाच हजार पाचशे ते पाच हजार सहाशे भाव प्रति क्विंटल मिळत आहे.

 

कापसाला तर नऊ हजार तीनशे भाव मिळाला होता. शेतकर्‍यांना भावात आजून सुधारणा होऊन कापूस लवकरच दहा हजाराचा टप्पा पार करीन अशी अपेक्षा असताना कापूस आठ हजार पाचशे रुपये प्रति क्कीटल भाव मिळत आहे. त्यात जवळपास आठशे रुपयांनी कापसाचे दर तुटले आहे. शेतकर्‍यांच्या पिकांना असा भाव मिळून शेतकर्‍यांची व्यापारी एकप्रकारे लूट करीत आहे. पण शेतकर्‍यांना पैशाची गरज असल्याकारणाने शेतकरी आहे तो भाव घेऊन आपले धान्य व कापूस विकत आहे

शेतकर्‍यांना एकतर पीक विम्याची तुटपुंजी रक्कम मिळाली.

 

त्यात पावसाने नुकसान होऊन महसूल विभागाच्या माध्यमातून पंचनामे करून दोन महिने उलटून गेली तरी शेतकर्‍यांना अजून अतिवृष्टीची मदत मिळाली नाही. व कोणी त्यावर बोलण्यास तयारदेखील नाही.शेतकर्‍यांना मदत मिळवून देणे लांब राहिले, पण कमीतकमी यांचे दर तरी स्थिर ठेऊन सहकार्य करण्यासाठी मदत करण्याची अपेक्षा ग्रामीण भागातील शेतकरी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button