अहमदनगरला हादरवणारी बातमी ! हनीट्रॅप प्रकरणात बड्या नेत्याची मध्यस्ती, पाच लाख दे, अन्यथा

Ahmednagar News :- बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 5 लाख रुपये मागितल्याचा धक्कादायक प्रकार एका व्हायरल ऑडिओ क्लिपमधून समोर आला आहे. एका प्रेम संबंधातून हा प्रकार झाला असावा असे वाटत असले तरी पैशासाठी हा एक हानीट्रॅपचा प्रकार तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हे पैसे उकळण्यासाठी एका बड्या नेत्याला मध्यस्ती घातले असून तो अशाच प्रकारच्या दलाल्या करीत असल्याचे समोर येऊ लागले आहे. इतकेच काय.! गुन्हे दाखल होऊ नये म्हणून तो पोलिसांशी देखील अर्थपुर्ण तडजोडी करीत असल्याचे व्हायरल ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे.
त्यामुळे, कायदा हा महिलांच्या बाजुने आहे. तुम्हाला यातून वाचायचे असेल तर पाच लाख रुपये देऊन संबंधित महिलेकडून लेखी घ्या आणि प्रकरण येथून रफा दफा करा असे हा मध्यस्ती म्हणतो आहे.
त्यामुळे, जात आणि कायद्याच्या नावाखाली काही महिला पुरुषांना ब्लॅकमेल करुन लाखो रुपये उकळु पहात असल्याचे समोर येऊ लागले आहे. मात्र, बदनामी नको म्हणून लोक कसेबसे पैसे जमा करतात आणि यांना देतात.
आता या प्रकरणाची पोलिस विभागाने चौकशी करुन जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. अशा प्रकारची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुढे येऊ लागली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील एका व्यक्तीच्या विरोधात नाशिक येथील एका पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार नेण्यात आली होती.
मात्र, त्यापुर्वीच यांना एक तक्रार निवारण समितीचे महाशय सापडले. यांनी हे प्रकरण स्वत:कडे घेतले आणि यांच्यात एक मध्यस्ती घडवून आणली. त्यात असलेल्या संभाषणानुसार असे होते की, एका विधवा महिलेवर संगमनेरच्या एका व्यक्तीने अत्याचार केला होता.
त्याने संबंधित महिलेला रुम आणि अन्य काही ठिकाणी नेले होते. तर यांच्यात काही आर्थिक व्यावहार देखील झाले होते. मात्र, कालांतराने यांच्यात बिनसले आणि महिलेने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.
त्यानंतर एका पक्षाच्या या पदाधिकार्याने हे प्रकरण सामोपचाराने सोडविले असे त्याचे म्हणणे आहे. मात्र, हा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून संबंधित महिलेला पाच लाख रुपये देणे ठरले आहे.
मात्र, हा तोडगा निघाल्यानंतर ज्याने अत्याचार केला, तो अद्याप पैसे घेऊन आलेला नाही. म्हणून, या मध्यस्तीने त्याच्या घरी फोन केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे.