Nita Ambani Tea : काय सांगता! नीता अंबानी पितात जगातील सर्वात महागडा चहा, आकडा पाहून तुमचेही फिरतील डोळे
नीता अंबानी यांना अनेक महागड्या वस्तू वापरण्याची सवय आहे हे तर संपूर्ण जगाला माहिती आहे. मात्र त्या जगातील सर्वात महाग चहा पितात आणि त्या चहाची किंमत लाखोंच्या घरात आहे.

Nita Ambani Tea : भारतातील नागरिकांना चहा पिण्याची एक वेगळीच सवय आहे. अनेकजण चहा मूड फ्रेश करण्यासाठी पित असतात तर अनेकजण चहाची सवय लागलेली असते म्हणून चहा पितात. मात्र आजपर्यंत तुम्ही दहा, वीस किंवा त्यापेक्षा अधिक किमतीचा चहा पिला असाल.
पण देशातील सर्वात श्रीमंत महिला उद्योगपती नीता अंबानी या जगातील सर्वात महागड्या चहाचे सेवन करत आहेत. नीता अंबानी यांच्या चहाची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. नीता अंबानी यांना सर्वच महागड्या वस्तू वापरण्याचा शौक आहे.
नीता अंबानी यांच्या पाण्यापासून ते त्यांच्या पर्सपर्यंत सर्वच महागड्या वस्तू त्या वापरतात. याबद्दल तर तुम्ही ऐकले असेल. मात्र त्याची किंमत कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? चला तर नीता अंबानी यांच्या चहाच्या किमतीबद्दल जाणून घेऊया…
नीता अंबानी या त्यांच्या दिवसाची सुरुवात चहापासून करतात असे बोलले जाते. सामान्य माणूस किंवा इतर कोणताही व्यक्ती चहा पिण्यासाठी एक साधा कप किंवा त्यापेक्षा इतर कोणतेही साधन वापरत असतो. मात्र नीता अंबानी या ज्या कपमधून चहा पितात तो साधासुधा नसून त्यांची किंमत तब्बल ३ लाख रुपये आहे.
नीता अंबानी या ज्या कपमध्ये चहा पितात तो कप जपानची सर्वात जुनी क्रॉकरी कंपनी नोरिटेकने बनवली आहे. या संपूर्ण अँटिक चहाच्या सेटची किंमत दीड कोटींहून अधिक आहे. अशाप्रकारे नीता अंबानी रोज पिणाऱ्या चहाची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे, तर एका कप चहाची किंमत 3 लाख रुपये आहे.
त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील सर्वोत्तम दर्जाचे बनलेले आहे आणि ते सोन्याचे आणि प्लॅटिनम प्लेटेड आहे. मात्र नीता अंबानी आणि त्यांचे कुटुंब साधे जेवण करतात हे तर सर्वांनाच माहिती आहे.
नीता अंबानी यांच्याकडे अनेक महागड्या पर्स देखील आहेत. तसेच त्यांच्या ४० लाख किमतीची साडी देखील आहे. नीता अंबानी या जगातील सर्वात महागडी साडी परिधान करतात. त्यांचा हा विक्रम गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवला गेला आहे.
केवळ नीता अंबानीच नाही तर त्यांची मुलगी ईशा अंबानीनेही तिच्या लग्नात जगातील सर्वात महागडा लेहेंगा घातला होता, ज्याची किंमत 90 कोटींहून अधिक आहे. त्यामुळे नीता अंबानी आणि त्यांची मुलगी इशा अंबानी यांना महागड्या वस्तू वापरण्यास आवडतात हे तर सर्वांना माहिती झाले असेल.