लेटेस्ट

काही झाले तरी ते महाराष्ट्रात पुन्हा येणार नाहीत : संजय राऊत

आमचे भाजपातील मित्र रोज तारखा देत आहेत, रोज रंग उधळत आहेत. ते नकली रंग आहेत, अशा नकली रंगांवर केंद्र सरकारची बंदी आहे.

त्यामुळे त्यांना पवार साहेब यांनी उत्तर दिलंय. काही झाले तरी ते महाराष्ट्रात पुन्हा येणार नाहीत, असा टोला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, घाबरू नका पुन्हा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला येऊ देणार नाही.

हे त्यांचे विधान केवळ राष्ट्रवादी पक्षासाठी नाही तर पूर्ण महाविकास आघाडी पक्षासाठी त्यांनी मांडलेली भूमिका आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

भारतीय जनता पक्षाला वाटत असेल की केंद्रीय तपास यंत्रणा, खोटे आरोप, चिखलफेक करून महाविकास आघाडीचे खासदार, आमदार, नेते यांचे मनोबल ते खाली आणण्याचा प्रयत्न करणार असतील तर ते चुकीचे आहे.

आपल्या दंडात ताकद आहे असे त्यांना वाटते, पण तसे अजिबात नाही. कारण ते समोरुन नाही तर मागून वार करतात. राजकारणात असे पाठीमागचे हल्लेदेखील पचवायचे असतात, जे आम्ही पचवतो, असे राऊत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button