Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरनिळवंडेसाठी पिचड यांचे काम कुणीही नाकारू शकत नाही : मंत्री विखे

निळवंडेसाठी पिचड यांचे काम कुणीही नाकारू शकत नाही : मंत्री विखे

Ahmednagar News : भंडारदारा आणि निळवंडे धरणाच्या उभारणीसाठी अकोलेकरांनी केलेला त्याग खूप मोठा आहे. धरण आणि कालव्यांच्या कामासाठी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचा पुढाकार कोणोही नाकारू शकणार नाही,

जलनायक कोणीही होत असले, तरी नथनीचं कौतुक करून घेणाऱ्यांनी नाक देणाऱ्याला विसरू नये, असा टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला,

डाव्या कालव्याप्रमाणेच उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचा शब्द महायुती सरकारने पूर्ण केल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

आयोध्येमधील प्रभू श्रीराम मृतीं स्थापनेच्या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. यावेळी मंत्री विखे बोलत होते.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते मधुकरारच पिचड, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार वैभव पिचड, सीताराम गायकर,

भाजपाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, जलसंपदा विभागाचे बाळासाहेब शेटे,

कैलास ठाकरे यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते. या कालव्यावरील पुलाला श्रीराम जलसेतू नाव देण्याची घोषणा मंत्री विखे पाटील यांनी केली.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, अनेक वर्षे लाभक्षेत्रातील शेतकन्यांना पाण्याचा संघर्ष करावा लागला; पण आता पाण्याची प्रतिक्षा संपाली आहे.

डाव्या कालव्याप्रमाणेच उजव्या कालव्याला पाणी मिळाल्याने योन्ही कालव्यांवरील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णयोस आणि ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या पुढाकाराने वरच्या भागातील कालव्यांच्या कामांना सुरुवात झाल्यामुळेच पाणी शेवटच्या गावाला मिळण्यात यश आले.

धरणाचे आणि कालव्याचे काम अकोले तालुक्यात होते; पण खालच्या भागातच आंदोलन सुरू होते. या भागातील शेतकन्यांनी जमीनी दिल्या नसत्या तर प्रकल्प उभा राहू शकला नसता.

या भागातील शेतकऱ्यांच्या त्यागामुळेच भंडारदारा निळवंडे प्रकल्प उभे राहिले. लाभक्षेत्रातील तालुक्याची समृद्धता या प्रकल्पामुळे आहे. उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा आहे.

या कामाचे श्रेय घेऊन कोणीही जालनायक खलनायक होत आहेत, अशी टीका मंत्री विखे यांनी केली.

माजी मंत्री मधुकराव पिचड यांनी धरण आणि कालव्यांच्या कामाच्या वाटचालीचा आढावा घेऊन अनेकांच्या त्यागाने प्रकल्प उभे राहिल्याचे सांगून पुढच्या पिढीने या कामाचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, माजी आमदार वैभव पिचड यांची भाषणे झाली. प्रास्ताविक अभियंता कैलास ठाकरे यांनी केले,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments