बाजारभाव

कांद्याला अपेक्षित भाव मिळेना, शेतकरी चिंतेत; मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- शेतकऱ्यांनी आपला कांदा साठवून ठेवला आहे. आज, उद्या भाव मिळाला तर दोन पैसे मिळतील या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला अपेक्षित भाव मिळत नाही.

 

दरम्यान जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल रविवारी 10 हजार 859 गोणी कांद्याची आवक झाली. कांद्याला सर्वाधिक 1600 रुपये भाव मिळाला.

 

भाव 1500 ते 1600 रूपयांच्या पुढे जात नाही तर दुसरीकडे साठवलेला कांदा खराब होत आहे.

 

राहाता बाजार समितीत कांदा नंबर 1 ला 1200 ते 1600 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 850 ते 1150 रुपये, कांदा नंबर 3 ला 300 ते 800 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 600 ते 800 रुपये, तर जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button