टेक्नॉलॉजी

Nothing Phone (1) Offer : धमाकेदार ऑफर ! नथिंग फोन (1) मिळेल 18 हजार रुपयांची स्वस्तात, जाणून घ्या कुठे खरेदी करायचा…

तुम्हाला नथिंग फोन (1) वर जोरदार ऑफर मिळत आहे. तुम्ही हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता. यावर तुम्हाला 18 हजार रुपयांची सूट मिळत आहे.

Nothing Phone (1) Offer : जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. कारण आता तुम्ही नथिंग फोन (1) स्वस्तात खरेदी करू शकता.

कारण अमेरिकन टेक कंपनी Nothing ने पुढील आठवड्यात आपल्या स्मार्टफोन Nothing Phone (1) ला लेटेस्ट अपडेट NothingOS 2.0 अपडेट देण्याची घोषणा केली आहे. आता या फोनवर 18,000 रुपयांची मोठी सूट देखील मिळत आहे.

नुकतेच, या कंपनीने नथिंग फोन (2) लाँच केला आहे, त्यानंतर आधीच्या नथिंग फोनवर (1) बंपर डिस्काउंटचा लाभ दिला जात आहे. कंपनीने आपल्या यूजर्सना खुशखबर देताना सांगितले आहे की या फोनला पुढील आठवड्यात NothingOS 2.0 अपडेट मिळणे सुरू होईल.

जरी कंपनीने NothingOS 2.0 रिलीजची कोणतीही अधिकृत तारीख शेअर केली नाही, परंतु हे स्पष्ट केले आहे की वापरकर्त्यांना पुढील आठवड्यात हे अपडेट मिळणे सुरू होईल.

तसेच Android 13 वर आधारित या अपडेटसह, मोनोक्रोम अॅप आयकॉन्स, नवीन विजेट्स, लॉक-स्क्रीन कस्टमायझेशन, क्लोन अॅप सपोर्ट आणि अॅप्स लॉक करण्याचा पर्याय यामध्ये उपलब्ध असेल.

नथिंग फोन (1) वर मोठी सूट

नथिंग स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 37,999 रुपये आहे परंतु 23% डिस्काउंटनंतर तुम्हाला फ्लिपकार्टवर 28,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

याशिवाय, फेडरल बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10% सवलत आणि HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट किंवा EMI व्यवहार केल्यास 1,000 रुपयांची सूट दिली जात आहे. Flipkart Axis Bank कार्डवरून पेमेंट केल्यावर 5% कॅशबॅक देखील दिला जात आहे.

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 6.55-इंचाचा फुल HD + 120Hz डिस्प्ले आहे आणि मागील पॅनलवर 50MP + 50MP ड्युअल कॅमेरा उपलब्ध आहे. या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G+ प्रोसेसर असून जो खूप वेगवान गतीने काम करतो. अशा प्रकारे हा स्मार्टफोन खरेदी करणे तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button