अहमदनगर

कुख्यात गुंड, वाळू तस्कर गावठी कट्ट्यासह जेरबंद

अहमदनगर- गेल्या सात वर्षांपासून पसार असलेल्या कुख्यात गुंड, वाळू तस्कराच्या मुसक्या आवळण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे. सुभाष साहेबराव माळी असे त्याच नाव आहे. त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.

 

राहुरी तालुक्यातील बारागांव नांदुर येथे राहुरी पोलीसांनी सापळा लावुन माळी याला जेरबंद केले आहे. राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत सुभाष साहेबराव माळी हा त्याचे पत्नीला भेटण्यासाठी बारागांव नांदुर येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली असता. पोलिसांनी साधे वेशात तीन दिवसांपासून सापळा लावला असता मंगळवारी सायंकाळी 7 वा. सुमारास बारागांव नांदुर येथे आला असता सुभाष माळी यास झडप घालुन ताब्यात घेतले आहे.

 

त्यांच्या अंगझडतीमध्ये गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे मिळुन आले असून राहुरी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, राहुरी पोलीस स्टेशनकडील पोसई सज्जनकुमार नहेडा, पोसई निरज बोकील, पोहेकाँ जायभाय, पोना अमित राठोड, पोकों आजिनाथ पाखरे, पोकों सचिन ताजणे, पोकाँ नदीम शेख, पोकों अमोल पडोळे, पोकाँ महेंद्र गुंजाळ, पोकाँ आदिनाथ चेमटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button