Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरआता नगर जिल्ह्यात देखील 'रामराज्य' येणार ...? : आमदार राम शिंदे

आता नगर जिल्ह्यात देखील ‘रामराज्य’ येणार …? : आमदार राम शिंदे

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली आहे व यामुळे देशात रामराज्य आले आहे. अशाच पद्धतीने नगर जिल्ह्यातही आता ‘रामराज्य’ येणार आहे, असे मत भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांनी केले. ते पारनेर तालुक्यातील कोरठण खंडोबा येथे बोलत होते.

सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नगर दक्षिण जिल्ह्यातून भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याची समर्थकांना खात्री आहे.

मात्र, विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनीही खासदारकी लढवण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली आहे तर दुसरीकडे महायुती सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके व त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांनीही पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

प्रा. शिंदे व आ. लंके कोरठण खंडोबा येथील यात्रा उत्सवात एकत्र होते. त्यामुळे साहजिकच राजकीय चर्चांना उधाण आले व त्यात सूचक राजकीय भाष्य करीत शिंदे व लंके यांनी भर टाकल्याने राज्यभरात हा चर्चेचा विषय झाला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments