आता जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारणार ; कारण राबवणार ‘हा’ उपक्रम

अलीकडच्या काळात प्रत्येकाचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकण्याकडे आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा दिवसेंदिवस कमी होत आहेत.
त्यातल्या त्यात जिल्हा परिषदेची शाळा म्हटले की अनेकजण तोंड वाकडे करतात. परंतु आता हे चित्र पालटणार आहे.
कारण नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख आदी ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम राबवणार आहेत.
याबाबत सूचना जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांनी शिक्षण विभागास दिल्या. आगामी काळात शिक्षक व केंद्रप्रमुख यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी तयार करण्यात येणाऱ्या
प्रश्नावलीमध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यांची एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी कसे प्रविष्ठ होतील
यादृष्टीने नियोजन करावे.अनुदानित, खाजगी, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांनी देखील याबाबत १०० टक्के नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.