NPCIL Recruitment 2023 : 8वी ते 12वी पास तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, लगेच याठिकाणी करा अर्ज
तुम्हाला सरकारी नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही याठिकाणी अर्ज करू शकता. ही संधी 8वी ते 12वी पास तरुणांसाठी आहे.

NPCIL Recruitment 2023 : देशात तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी धरपड करत आहे. असा वेळी खाजगी नोकरीपेक्षा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. मात्र सरकारी नोकरी मिळवणे एवढे सोप्पे नसते.
परंतु जर तुम्ही कठीण परिश्रम घेऊन जर सरकारी भरतीची केली तर नक्कीच तुम्हाला नोकरी मिळेल. अशा वेळी आज तुमच्यासाठी ही संधी उपलब्ध झालेली आहे.
जर तुम्हीही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड (NPCIL) ने ट्रेड अप्रेंटिससाठी 183 रिक्त जागा सोडल्या आहेत.
त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल, तर तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता. तुम्ही http://www.npcil.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.
या भरतीसाठी इयत्ता 8 वी ते 12 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अनेक पदांवर शिकाऊ उमेदवारांच्या जागा रिक्त आहेत. ज्यामध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. या पदांसाठी कमाल वय 24 वर्षे असावे. तसेच आरक्षित प्रवर्गाला नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.
कोणत्या पदांवर किती जागा रिक्त आहेत?
फिटरसाठी 56 जागा रिक्त आहेत. मशिनिस्टसाठी 25, वेल्डरसाठी 10, इलेक्ट्रिशियनसाठी 40, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी 20, पंप ऑपरेटर कम मेकॅनिकसाठी 07, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकची 20 आणि मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगची 05 पदे भरण्यात येणार आहेत.
निवड कशी होईल?
या भरतीमध्ये आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यानंतर उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी बोलावले जाईल. शॉर्टलिस्टिंग प्रक्रियेत वयाने मोठ्या असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. निवड झाल्यानंतर एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
पगार किती असेल?
एक वर्षाचा आयटीआय अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना 7700 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. दुसरीकडे, 2 वर्षांचा कोर्स केलेल्या लोकांना 8855 रुपये प्रति महिना मिळणार आहेत.