Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरआरबीआयची कठोर कारवाई ! महाराष्ट्रातील 'या' चार सहकारी बँकांवर ठोठावला लाखो रुपयांचा...

आरबीआयची कठोर कारवाई ! महाराष्ट्रातील ‘या’ चार सहकारी बँकांवर ठोठावला लाखो रुपयांचा दंड, या बँकेत तुमचेही खाते आहे का?

Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने आज अर्थातच 1 फेब्रुवारी 2024 ला एक मोठा निर्णय घेतला आहे. बँकेने आज महाराष्ट्रातील चार बड्या सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे जाहीर केले आहे. यामुळे सदर बँकेतील खातेधारकांमध्ये थोडेसे भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज आरबीआयने शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक, जनता को-ऑपरेटिव्ह बँक, सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. आरबीआयने याबाबतचे परिपत्रक निर्गमित केले आहे.

यामध्ये या चार बँकांकडून किती रुपयांचा दंड आकारला जाणार आहे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआयच्या माध्यमातून देशातील अनेक मोठ्या बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही बँकांचे लायसन्स देखील रद्द करण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात अर्थातच जानेवारीमध्ये कर्नाटक मधील एका बड्या सहकारी बँकेचे लायसन्स रद्द करण्याचा निर्णय आरबीआयकडून घेण्यात आला आहे. 12 जानेवारी 2024 ला कमकुवत आर्थिक स्थितीचे कारण देत हिरीयुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून घेण्यात आला होता.

बँकेचे अस्तित्व तिच्या ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक आहे; बँक, तिच्या सद्य आर्थिक स्थितीसह, तिच्या सध्याच्या ठेवीदारांना पूर्ण देय देण्यास असमर्थ असेल असे म्हणतं RBI ने या सहकारी बँकेचे लायसन्स रद्द केले होते. दरम्यान आता फेब्रुवारी महिन्याच्या अगदी सुरुवातीलाचा आरबीआयने महाराष्ट्रातील चार सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

कोणत्या बँकेला कितीचा दंड ?

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शिरपूर येथील शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव बँकेवर दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सेंट्रल बँकेने म्हणजे RBI ने जनता सहकारी बँकेला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. KYC नियमांचे पालन न केल्याबद्दल नागरीक सहकारी बँक मर्यादित या बँकेला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तसेच जनता सहकारी बँक लिमिटेडला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयच्या या कारवाईमुळे मात्र ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही. यामुळे ग्राहकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही असे जाणकारांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments