अहमदनगर

श्री बाणेश्‍वर महाविद्यालायच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश

श्री बाणेश्‍वर शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यायीन स्पर्धेत घववघीत यश संपादन केले.

कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात झालेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत सौरभ अंबादास मराठे याने 70 किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी केली.

त्याची आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. पिंपरी चिंचवड येथे झालेल्या आंतर विभागीय ऍथलेटिक्‍स क्रीडा स्पर्धेत बाणेश्‍वर महाविद्यालयाच्या अनिकेत कोळगे याने 110 मीटर अडथळ्याची शर्यत या क्रीडाप्रकारात रौप्यपदक मिळविले तसेच चारशे मीटर अडथळ्याची शर्यत क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकाविले.

दरम्यान, पेमराज सारडा महाविद्यालयामध्ये पार पडलेल्या ज्युदो स्पर्धेत प्रियंका कराळे व कल्पना पंडित या विद्यार्थिंनीनी यश संपादन केले.

त्यांची नाशिक येथे होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरविभागीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. मनीषा पुंडे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे बाणेश्‍वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले,

सचिव जी. डी. साठे, रजिस्टार विलास बोर्डे, प्राचार्य डॉ. एस. एस. जाधव, उपप्राचार्य व्ही. एम. जाधव आदींसह सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button