अहमदनगरताज्या बातम्याराहुरी

सुरत हैद्राबाद हायवेच्या मोजणीसाठी बंदोबस्तात आले अधिकारी; शेतकऱ्यांनी फिरवले माघारी !

अगोदर गुणांक दोन प्रमाणे भाव जाहीर करावा. तोपर्यंत आम्ही मोजणी होऊ देणार नाही, असा पवित्रा यावेळी शेतकऱ्यांनी घेतला.

सुरत-हैद्राबाद हायवेच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना राहुरी येथील शेतकऱ्यांनी पुन्हा विरोध केल्याने अधिकारी शेतकाऱ्यांसमोर हतबल झाले.

अगोदर गुणांक दोन प्रमाणे भाव जाहीर करावा. तोपर्यंत आम्ही मोजणी होऊ देणार नाही, असा पवित्रा यावेळी शेतकऱ्यांनी घेतला.

गेल्या दोन वर्षापासून सुरत- हैद्राबाद या महामार्गासाठी शासनाकडून भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी याला विरोध केला. त्याप्रमाणे राहुरी येथील शेकडो शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेला यापूर्वी अनेकवेळा विरोध केला.

Advertisement

त्यामुळे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हाथ हलवत परतावे लागले होते. दरम्यान, जिल्हाधिकारी व शेतकऱ्यांची अनेकवेळा बैठक झाली. मात्र बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.

मंगळवार (दि. १०) रोजी गोटुंबे आखाडा, राहुरी खुर्द व मोमीन आखाडा परिसरात एकाचवेळी पोलिस बंदोबस्त घेऊन अधिकारी मोजणीसाठी गेले.

यावेळी मोमीन आखाडा परिसरात शेतकऱ्यांनी मोजणीला कडाडून विरोध करत अगोदर गुणांक दोन प्रमाणे भाव जाहीर करावा. त्याबाबत लेखी द्यावे, असा आग्रह धरला. जोपर्यंत गुणांक दोन प्रमाणे भाव जाहीर करत नाही.

Advertisement

तोपर्यंत आम्ही प्रशासनाला कोणत्याही प्रकारे सहकार्य करणार नाही. प्रशासनाने जोर जबरदस्ती केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

प्रांत अधिकारी किरण सावंत पाटील यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करून मोजणी करून देण्याची विनंती केली. मात्र शेतकरी त्यांच्या निर्णयावर ठाम होते.

दुपारी उशिरापर्यंत कोणताच मार्ग निघाला नाही. पोलिस बंदोबस्त घेऊन देखील अधिकारी शेतकऱ्यांसमोर हतबल झाले होते. तर शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले होते.

Advertisement

यावेळी भारत भूजाडी, सुभाष वराळे सूर्यकांत भूजाडी, गंगाधर सांगळे,तोडमल, आतार, गुलदगड, मेहेत्रे दहिवाळकर आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button