अहमदनगर

चारचाकी वाहन लावण्यावरून तिघांकडून एकास मारहाण

मित्रांना भेटण्यासाठी माळीवाडा बस स्थानकाजवळ गेलेल्या एकाला तिघांनी मारहाण केली. चारचाकी वाहन लावण्यावरून ही मारहाण केली आहे.

युवराज पद्माकर कुलकर्णी (रा. भुतकरवाडी, अहमदनगर) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींमध्ये आयु ब महेबूब शेख (रा. भातोडी ता. नगर), रफीक शेख (रा. बुरूडगाव रोड, अहमदनगर) व अन्य एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे.

युवराज कुलकर्णी यांचे मित्र पुण्यावरून अक्कलकोट येथे जात होते. युवराज त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी माळीवाडा बस स्थानकाजवळ आले होते.

त्यांनी रस्त्याच्या कडेला त्यांचे चारचाकी वाहन उभे केले. त्यावरून तिघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.p

Related Articles

Leave a Reply

Back to top button