अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात कुऱ्हाड घालून एकाचा खून ! अल्पवयीन आरोपी अटकेत

पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथे डोक्यात कुन्हाडीने घाव घालून एका व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. यात सुपा पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
विशेष म्हणजे गुन्ह्यातील तीनही आरोपी अल्पवयीन आहेत. या घटनेने पारनेर तालुका हादरला आहे. ही घटना गुरुवारी (दि.२२) रात्री घडली. संतोष बबन गायकवाड (रा. नारायणगव्हाण, ता. पारनेर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नारायणगव्हाण येथील गायकवाड परिवार व दरेकर परिवार यांच्यात यापूर्वीच मोठा वाद झाला होता. गुरुवारी (दि.२३) रात्री ८ ते १० वाजेदरम्यान तीन अल्पवयीन मुले संतोष गायकवाड यांच्या घराजवळ गेले.
या तीनही जणांनी गायकवाड यांना कुन्हाडीने डोक्यात घाव घालून ठार केले. घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी घटनास्थळी दाखल झाल्या.
घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तत्का माहिती गोळा करत घटनेतील तीनही आरोपींना रात्रीच अटक केली. प्राथमिक माहितीनुसार तीनही आरोपी अठरा वर्षांच्या आतील आहेत.
या प्रकारामुळे नारायणगव्हाण परिसरात तणावाचे वातावरण होते. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी पुढील तपास करत आहेत.