अहमदनगरताज्या बातम्यापाथर्डी

अहमदनगर ब्रेकिंग : दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक ठार ! परिसरात खळबळ

Ahmednagar News : पाथर्डी शहरातील मध्यवस्तीत असलेल्या रंगार गल्ली येथे सोमवारी रात्री दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला.

दरोडेखोरांनी खून करून चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. संजय रामचंद्र गुरसाळी (वय ४६) असे मयताचे नाव आहे.

विशेष म्हणजे या घटनेची माहिती घरातील सदस्यांना मंगळवारी सकाळी समजली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Advertisement

यावेळी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. श्वानपथकाने घरामागील असलेल्या चिंचपूर रोडपर्यंत मार्ग दाखवला. याबाबत मयताचे भाऊ राजेंद्र रामचंद्र गुरसाळी यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबाबत सविस्तर वृत्त असे कि राजेंद्र यांचा हॉटेल व्यवसाय असून, त्यांचा लहान भाऊ संजय यांचे इलेक्ट्रिक दुकान आहे. सोमवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे गुरसाळी बंधू रात्री जेवण करून घरात झोपले. संजय राजेंद्र हे घराच्या वरच्या मजल्यावर, तर घरातील बाकीचे सदस्य खालच्या मजल्यावर झोपले होते.

मंगळवारी सकाळी घरातील इतर सदस्य उठले तेव्हा त्यांना स्टोअररुममधील कपाट उघडले दिसले, तर झोपलेल्या संजय यांच्या कानाच्या बाजुला मोठी जखम झालेली दिसली.

Advertisement

संजय यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता ते उठले नाहीत. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, गुरसाळी यांच्या घरातील कपाटातील ४ लाख ८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे

आरोपींच्या शोधासाठी तीन पथके तैनात

Advertisement

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या घटनेमध्ये निष्पाप व्यक्तीचा बळी गेला असून, आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके तयार केली आहेत.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button