अहमदनगरताज्या बातम्याश्रीगोंदा

अहमदनगर ब्रेकिंग : पुरात एक जण गेला वाहून ! सहा तासांच्या शोध मोहिमेनंतरही अपयश

ओढा ओलांडताना पुलावरून वाहणाऱ्या पाण्याच्या वेगात घोडके पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात पडले. सहा तासांच्या शोध मोहिमेनंतरही त्यांना शोधण्यात अपयश आले. ही घटना मंगळवारी (दि.२६) घडली.

श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथील कन्हेर ओढ्याला आलेल्या पुरामध्ये शोभाचंद गणपत घोडके (वय ५२) हे वाहून गेले.

ओढा ओलांडताना पुलावरून वाहणाऱ्या पाण्याच्या वेगात घोडके पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात पडले. सहा तासांच्या शोध मोहिमेनंतरही त्यांना शोधण्यात अपयश आले. ही घटना मंगळवारी (दि.२६) घडली.

सोमवारी मध्यरात्री आढळगाव, कोकणगाव, भावडी परिसरात जोरदार पाऊस झाला. भावडी, कोकणगाव गावातील तलाव भरल्यामुळे पाणी खाली झेपावले. चांडगाव गावालगत असलेल्या कन्हेर ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहू लागले. प्रवाहाचा वेग जास्त होता. मंगळवारी १०.३० वाजेच्या सुमारास पुलावरून ओढा ओलांडत असताना शोभाचंद घोडके पाण्याच्या वेगामुळे प्रवाहात खेचले गेले.

Advertisement

घोडके वाहून गेल्याचे समजताच भाजपा नेते रवींद्र म्हस्के, सेवा संस्थेचे अध्यक्ष अनिल म्हस्के यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. नारायण घोडके, नाना घोडके, जनार्दन म्हस्के, बाळू चाकणे, शोभाचंद म्हस्के, गणेश म्हस्के यांच्यासह तरुणांनी शोधण्याचा प्रयत्न केला.

अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले महसूल विभागाच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पेडगाव येथील तरुणांसह श्रीगोंदा येथील आपदा मित्रांनी घोडके यांचा शोध घेतला. परंतु, गढूळ पाण्यामुळे शोधमोहीम अपयशी ठरली.

ओढ्यावरील पुलाची उंची कमी असल्यामुळे पुलावर नेहमीच पाणी येते. योग्य उंचीचा पूल असता तर घोडके वाहून गेले नसते. या ठिकाणी नवीन पुलाची मागणी करणार असल्याचे रवींद्र म्हस्के यांनी सांगितले.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button