अहमदनगर

पिस्तुलाच्या धाकावर एकास लुटले; या ठिकाणी घडली घटना

संगमनेर तालुक्यातील लोहारे येथे अपहरण करून पिस्तुलाचा धाक दाखवून साडेतीन लाखाची खंडणीची मागणी करून फिर्यादीच्या खिशातील रोकड , मोबाईल व दुचाकी लांबविण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

दरम्यान याप्रकरणी भाऊसाहेब धोंडीराम देव्हारे (वय 48, धंदा नोकरी, रा. उंबरे ब्राम्हणी, ता. राहुरी हल्ली रा. मुसळे वस्ती, लोणी. ता. राहाता) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.  या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, किरण नानासाहेब दुशींग रा. उंबरे ता. राहुरी तसेच अज्ञात तिघांनी बुधवार दि. 27 एप्रिल रोजी कोंची – मांची शिवारात तसेच तळेगाव रस्त्याने लोहारे येथे आपले अपहरण करून पिस्तुलचा धाक दाखवून 3 लाख 50 हजार रुपये खंडणीची मागणी केली.

आरोपींनी फिर्यादीचे खिशातील 11 हजार 500 रुपये रोख तसेच 30 हजार रुपये किमतीची पल्सर मोटार सायकल तसेच 7 हजार किंमतीचा मोबाईल लंपास केला. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार किरण नानासाहेब दुशींग याच्यासह चौघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button