अहमदनगर

OnePlus 9 सीरीजचा ‘हा’ 5G स्मार्टफोन झाला स्वस्त; जाणून घ्या किंमत

OnePlus कंपनीने आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 9 Pro 5G च्या किंमतीत पुन्हा कपात केली आहे. सर्वात प्रीमियम OnePlus 9 series फोन, OnePlus 9 Pro 5G, गेल्या वर्षी मार्चमध्ये ६४,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता.

जाणून घ्या किंमत काही दिवसांपूर्वी या स्मार्टफोनवर ५,००० रुपयांची सूट मिळाली होती. किंमतीत कपात केल्यानंतर, स्मार्टफोन ५९,९९९ रुपये आणि ६४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होता.

आता, स्मार्टफोनच्या किंमतीत आणखी ५,८०० रुपयांची कपात झाली आहे. किमतीत कपात केल्यानंतर, ८ GB व्हेरिएंट आता ५४,१९९ रुपयांना उपलब्ध आहे आणि १२ GB व्हेरिएंटची किंमत आता ५९,१९९ रुपये आहे. फीचर्स ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरद्वारे Suported आहे.

3216 X 1440 पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.७ -इंचाचा क्वाड HD+ डिस्प्ले दाखवतो. हा स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित OxygenOS 12 चालवतो ४५०० mAh बॅटरी पॅक करतो. जी, ६५ W जलद चार्जिंग आणि ५० W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन एस्ट्रल ब्लॅक, आर्क्टिक स्काय आणि विंटर मिस्ट. या तीन रंगांमध्ये उपलब्ब्ध आहे.

कॅमेरा : फोटो ग्राफीसाठी स्मार्टफोन ४८ MP प्रायमरी + ५० MP अल्ट्रा वाइड + ८ MP टेलिफोटो + २ MP मोनोक्रोम सेन्सरच्या क्वाड रियर कॅमेर्‍यांसह सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये १६ MP फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button