अहमदनगरबाजारभाव

Ahmednagar Kanda Market : जिल्ह्यात कांद्याची आवक वाढली ! भाव मिळाला असा …

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी‎ (२६ जून) कांद्याची आवक काही प्रमाणात ‎ वाढली असून शेतकऱ्यांनी सुमारे ४०५० कांदा ‎ ‎गोण्या विक्रीसाठी आणल्या होत्या.

पारनेर‎ बाजार समितीमध्ये यावेळी झालेल्या‎ लिलावात ७ ते ८ लॉटला सर्वाधिक‎ प्रतिक्विंटल १३०० ते १८०० रुपये भाव मिळाला.‎ एक नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल १००० ते‎ १२०० रुपये भाव मिळाला.

‎ सध्या शेतकरी खरिपाची पेरणी करीत‎ आहेत. त्यामुळे खते व बियाण्यासह शेतीच्या ‎ ‎ लागवडीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज‎ असते. त्यामुळे शेतकरी सध्या भाव कमी‎ असूनही कांदा चाळीत ठेवलेला कांदा काही‎ प्रमाणात विक्रीसाठी काढताना दिसत आहेत.‎

अहमदनगर जिल्ह्यात मागील रब्बी हंगामात १‎ लाख ९० हजार ५२९ हेक्टरवर कांद्याची‎ लागवड झाली होती. यातून भरघोस उत्पादन‎ शेतकऱ्यांना मिळाले. मात्र, तीन महिन्यांपासून‎ कांद्याच्या भावात कमालीची घट झाली आहे.

‎ त्यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी काढत‎ नव्हते. परंतु सध्या खरिपाच्या पेरणीसाठी‎ शेतकरी नाईलाजास्तव कांदा विक्रीसाठी‎ काढताना दिसत आहेत. तसेच पावसाळ्यात‎ कांदा खराब होण्याचा जास्त धोका असतो.‎

त्यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी काढत‎ ‎आहेत. पारनेर बाजार समितीमध्ये रविवार,‎ बुधवार व शुक्रवार अशी आठवड्यातील तीन‎ दिवस कांद्याचा लिलाव होतो. रविवारी (२६‎ जून) पारनेर बाजार समितीत कांद्यचे लिलाव‎ झाले.

यावेळी सुमारे ४ हजार ५० कांदा‎ गोण्यांची आवक झाली होती. यातील ७ ते ८‎ लॉटला प्रतिक्विंटल सर्वाधिक म्हणजे १३०० ते‎ १८०० रुपये भाव मिळाला. एक नंबर कांद्याला‎ प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये भाव मिळाला,‎ तर दोन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल ७०० ते‎ ९०० रुपये भाव मिळाला, तर तीन नंबर‎ कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ६०० रुपये भाव‎ मिळाला, अशी माहिती पारनेर बाजार‎ समितीचे सचिव शिवाजी पानसरे यांनी दिली.‎

कांद्याची आवक किंचित वाढली‎ कांद्याच्या भावात घसरण झाल्यामुळे शेतकरी‎ रब्बीतील कांदा विक्रीसाठी काढत नव्हते. परंतु‎ सध्या खरीप पेरणीचा हंगाम सुरू असल्यामुळे‎ शेतकरी कांदा विक्रीसाठी काढताना दिसत‎ आहेत.

पारनेर बाजार समितीत १२ जून रोजी ३‎ हजार ६३७ कांदा गोण्यांची आवक झाली‎ होती. त्या तुलनेत रविवारी (२६ जून) बाजार‎ समितीत ४ हजार ५० कांदा गोण्यांची आवक‎ झाली. कांद्याची आवक काही प्रमाणात‎ वाढली आहे, असे पारनेर बाजार समितीचे‎ सचिव शिवाजी पानसरे यांनी सांगितले.‎

कांद्याची आवक किंचित वाढली‎ कांद्याच्या भावात घसरण झाल्यामुळे शेतकरी‎ रब्बीतील कांदा विक्रीसाठी काढत नव्हते. परंतु‎ सध्या खरीप पेरणीचा हंगाम सुरू असल्यामुळे‎ शेतकरी कांदा विक्रीसाठी काढताना दिसत‎ आहेत.

पारनेर बाजार समितीत १२ जून रोजी ३‎ हजार ६३७ कांदा गोण्यांची आवक झाली‎ होती. त्या तुलनेत रविवारी (२६ जून) बाजार‎ समितीत ४ हजार ५० कांदा गोण्यांची आवक‎ झाली. कांद्याची आवक काही प्रमाणात‎ वाढली आहे, असे पारनेर बाजार समितीचे‎ सचिव शिवाजी पानसरे यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Back to top button