बाजारभाव

‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळतोय 2800 रुपयांपर्यंत भाव

अहमदनगर- नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवारी आवकेत व भावात सुधारणा झाली. कांद्याची 30 हजार 638 गोण्या आवक झाली. तर भाव जास्तीजास्त 2800 पर्यंत निघाले.

 

मोठा कलरपत्ती कांदा 2000 ते 2350, मुक्कल भारी 1100 ते 1900, गोल्टा 700 ते 1100, गोल्टी 300 ते 800 रुपये भाव मिळाला.

 

लाल कांद्याला 2600 रुपयांपर्यंत भाव मिळाला. गोल्टी लाल कांद्याला 800 ते 1000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button