बाजारभाव

कांदा आवक घटली; मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल (सोमवारी) आठवड्याच्या पहिल्या दिवशी 40 हजार 663 गोणी नवीन लाल कांद्याची आवक झाली. शनिवारच्या तुलनेत ती 16 हजार गोण्यांनी कमी आहे. जास्तीत जास्त भाव 1900 रुपयांपर्यंत निघाला.

 

एक दोन लॉटला 1700 ते 1900 रुपये, मोठा कलर पत्तिवाल्या कांद्याला 1500 ते 1650 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1200 ते 1400 रुपये, गोल्टा 700 ते 900 रुपये, गोल्टी कांद्याला 500 ते 700 रुपये, जोड कांद्याला 200 ते 600 रुपये तर हलका डॅमेज कांद्याला 200 ते 400 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button