बाजारभाव

कांद्याची आवक वाढली; किती मिळतोय भाव

अहमदनगर- नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवारी कांद्याला जास्तीत जास्त भाव 1400 रुपयांपर्यंत निघाले. एक-दोन लॉटला 1350 ते 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याची 290 वाहनांमधून 52 हजार 849 गोण्या (29 हजार 67 क्विंटल) आवक झाली.

 

मोठा कलरपत्ती कांद्याला 1250 ते 1300 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1000 ते 1200 रुपये, गोल्टा कांद्याला 800 ते 1100 रुपये, गोल्टी कांद्याला 500 ते 700 रुपये, जोड कांद्याला 200 ते 450 रुपये, हलका डॅमेज कांद्याला 100 ते 600 रुपयांचा भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button