बाजारभाव

कांद्याची आवक वाढली; भावात घसरण

अहमदनगर – नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल सोमवारी एकूण 78 हजार 53 गोण्या (42 हजार 928 क्विंटल) कांद्याची आवक झाली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी कांद्याच्या आवकेत 7 हजार गोण्यांनी वाढ झाली तर जास्तीत जास्त भावात 100 रुपयांची घसरण झाली.

जास्तीत जास्त भाव 1700 रुपयांपर्यंत निघाले असून त्यात 100 रुपयांची घसरण दिसून आली. एक-दोन लॉटला 1600 ते 1700 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 1300 ते 1550 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1100 ते 1300 रुपये, गोल्टा कांद्याला 800 ते 1000 रुपये, गोल्टी कांद्याला 300 ते 800 रुपये, जोड कांद्याला 200 ते 550 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 100 ते 400 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button