बाजारभाव

कांदा मार्केट: एक लाख गोण्यांच्या आवकेचा टप्पा ओलांडला; मिळाला ‘हा’ भाव

अहमदनगर – नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवारच्या लिलावासाठी कांद्याने एक लाख गोण्यांच्या आवकेचा टप्पा ओलांडला. एक लाख गोण्याहून आवक होण्याची महिनाभरातील ही तिसरी वेळ आहे. दरम्यान संततधार पावसाचे वातावरण असतानाही कांद्याची प्रचंड आवक झाली आहे.

जवळपास 550 वाहनांतून कांद्याची एकूण 1 लाख 372 गोण्या (55 हजार 205 क्विंटल) इतकी प्रचंड आवक झाली. जास्तीत जास्त भाव 1700 रुपयांपर्यंत स्थिर होते.

एक-दोन लॉटला 1600 ते 1700 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 1300 ते 1650 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1100 ते 1300 रुपये, गोल्टा कांद्याला 800 ते 1050 रुपये, गोल्टी कांद्याला 300 ते 850 रुपये, जोड कांद्याला 200 ते 650 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 100 ते 400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button