बाजारभाव

जिल्ह्यातील बाजार समितीत कांदा, सोयाबीन, गहू, मका आणि डाळिंबला मिळतोय’हा’ भाव

अहमदनगर- राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याला प्रति क्विंटलला 1600 रुपये इतका भाव मिळाला. कांद्याच्या 13 हजार 416 गोण्यांची आवक झाली.

 

कांदा नंबर 1 ला 1200 ते 1600 रुपये, कांदा नंबर 2 ला 850 ते 1150 रुपये, कांदा नंबर 3 ला 300 ते 800 रुपये, गोल्टी कांदा 700 ते 900 रुपये, जोड कांदा 100 ते 300 रुपये असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

 

तर सोयाबीनला कमीत कमी 6100 रुपये, जास्तीत जास्त 6240 रुपये तर सरासरी 6175 रुपये. गव्हाला कमीत कमी 2151 रुपये, जास्तीत जास्त 2253 रुपये तर सरासरी 2200 रुपये भाव मिळाला. हरभरा सरासरी 2299 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 2000 रुपये भाव मिळाला.

 

डाळिंबाच्या 4111 क्रेट्स ची आवक झाली. डाळिंबाला नंबर 1 ला प्रति किलोला कमीत कमी 121 रुपये, तर जास्तीत जास्त 175 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 81 ते 120 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 41 ते 80 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button