बाजारभाव

कांद्याने शेतकऱ्यांना रडवले; मिळतोय कवडीमोल भाव

अहमदनगर- कांदा लागवड ते कांदा काढणीपर्यंत 50 ते 55 हजार रुपये प्रति एकरी खर्च करावा लागतो आणि उत्पादन एकरी 8 ते 9 टन उत्पादन मिळते. दरम्यान आता सध्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात कांदा पिकाने पाणी आणले आहे.

 

कांदा साधारणपणे एप्रिल ते मे महिन्यात काढला जातो तेव्हा कांद्याचे भाव प्रति किलो 6 ते 8 रुपये होता. आणि आज चार महिने कांदा मोठ्या प्रमाणात खर्च करून देखील त्याच भावात विकण्याची वेळ आली आहे.

 

शेतकर्‍यांनी जर कांदा काढला तेव्हाच विकला असता तर किमान झालेला खर्च तरी निघाला असता आणि साठवणुकीसाठी खर्च झाला नसता. पण तेव्हा भाव कमी असल्याने महिना-दोन महिन्यांनी भाव वाढतील या भरवश्यावर अनेक शेतकर्‍यांनी मोठा खर्च करून कांदा साठवणूक केली पण आज चित्र मात्र वेगळे निर्माण झाले आहे.

 

तेंव्हाचाच भाव आजही कायम असून भावात काही सुधारणा झाली नाही मात्र साठवून ठेवलेला कांदा ढगाळ वातावरण व रिमझिम पावसामुळे मोठ्या प्रमाणात सडत आहे.

 

एकरी 8 ते 9 टन उत्पादन घेतले आणि मोठा खर्च करून त्याची साठवणूक केली पण आज त्यातला 40% कांदा सडत असल्याने एकतर भाव मिळत नाही आणि डोळ्यासमोर कांदा सडत असल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर कांदा पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे जेणे करून शेतकरी टिकेल. जर अशीच परिस्थिती राहिली तर कांदा उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button