Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरभाजपला नावे ठेवणारेच आता भाजप पक्षप्रवेशाच्या वेटिंग लिस्टमध्ये : आमदार राम शिंदे...

भाजपला नावे ठेवणारेच आता भाजप पक्षप्रवेशाच्या वेटिंग लिस्टमध्ये : आमदार राम शिंदे यांची टीका

Ahmednagar News : लोक नेहमी प्रवाहच्या सोबत राहतात. पूर्वीच्या काळी भारतीय जनता पक्षाशी कोणी जवळी करीत नव्हते. भाजपला नावे ठेवणारेच आता भाजप पक्षप्रवेशाच्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या करिष्म्यामुळे देशातील जनता पक्षाच्या मागे उभे राहिले आहे. आगामी निवडणुकीनंतर देखील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन होईल.

‘काँग्रेसने मात्र इतरांवर टीकाटिपणी करण्यापेक्षा लोक आपल्या पक्षाला का सोडून जात आहेत ? याचे आत्मचिंतन करावे,’ असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री, आमदार राम शिंदे यांनी दिला आहे. चाई आढावा बैठकीनंतर त्यांनी उपस्थित पत्रकारांशी ते बोलत होते.

काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या वकील मंडळींच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात जिल्हाधिकारी कार्यालया आले होते. यावेळी थोरात यांनी ‘केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावातून विरोधी पक्षाचे नेते फोडण्याचे काम भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे.’ असा आरोप केला होता.

याकडे लक्ष वेधले असता आ. शिंदे म्हणाले, बाळासाहेब थोरात हे अनुभवी नेते आहेत. त्यांच्यापेक्षा मी लहान आहे. मात्र,आपल्या पक्षातील लोक पक्ष सोडून जात असतील तर त्याबाबत काँग्रेस पक्षाने आणि नेतेमंडळींनी आत्मचिंतन करावे. असा सल्ला शिंदे यांनी दिला.

कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथे तलाठी कार्यालयासाठी दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही. या दिरंगाई बद्दल जे जबाबदार असतील त्यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments