टेक्नॉलॉजी

Oppo Smartphone Offer : ओप्पोचा धमाका ! 99,999 रुपयांचा फोन खरेदी करा 25,999 रुपयांना, जाणून घ्या ऑफर

Oppo चा फोल्डेबल फोन 25,999 रुपयांमध्ये तुमचा असू शकतो. या फोनची MRP 99,999 रुपये आहे. बँक ऑफरमध्ये फोनची किंमत आणखी 2,000 रुपयांनी कमी केली जाऊ शकते.

Advertisement

Oppo Smartphone Offer : जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. कारण आता Oppo चा फोल्डेबल फोन 25,999 रुपयांमध्ये तुमच्याकडे असू शकतो.

या फोनची MRP 99,999 रुपये आहे. बँक ऑफरमध्ये फोनची किंमत आणखी 2,000 रुपयांनी कमी केली जाऊ शकते. हा फोन उत्कृष्ट फीचर्ससह येतो. अशा प्रकारे तुम्ही या संधीचा फायदा घेऊन एक महागडा फोन स्वस्तात खिशात ठेवू शकता.

ही खास डील फ्लिपकार्टवर आहे. या डीलमध्ये तुम्ही Oppo Find N2 फ्लिप MRP वरून अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची एमआरपी 99,999 रुपये आहे, परंतु डीलमध्ये हा डिस्काउंटनंतर 89,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Advertisement

एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही हा फोन 64,000 रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त डिस्काउंटसह ऑर्डर करू शकता. मात्र Oppo Find N2 Flip तुमच्या जुन्या फोनच्या पूर्ण एक्सचेंजवर रु. 89,999 – 64,000 मध्ये म्हणजेच रु. 25,999 मध्ये असू शकते. मात्र एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँडवर अवलंबून असेल. बँक ऑफरमध्ये हा फोन 2,000 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो.

वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन

फोनचा अंतर्गत डिस्प्ले 2520X1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. या E6 AMOLED डिस्प्लेचा आकार 6.8 इंच आहे. हे 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. फोनचा बाह्य AMOLED डिस्प्ले 3.26 इंच आहे आणि तो 60Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देखील देत आहे.

Advertisement

फोन 8GB LPDDR5 रॅम आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून, यात G710 MC10 GPU सह MediaTek Helio 9000+ चिपसेट आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

यात 50-मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button