पठाण चित्रपटला नगरमध्ये विरोध; चित्रपट गृहाबाहेर…

अहमदनगर- शहरातील कॉनप्लेक्स व आशा या दोन चित्रपट गृहासमोर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने करत पठाण चित्रपट बंद पाडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. चित्रपटाचे प्रसारण सुरू असताना बुधवारी सायंकाळी चित्रपट गृहाबाहेर घोषणाबाजी करत निदर्शने केली. पोलिसांनी आंदोलकांना अडवत चित्रपट गृहात प्रवेश नाकारला.
सावेडी उपनगरातील नव्याने सुरू झालेल्या कोहिनूर मॉल मधील कॉनप्लेक्स चित्रपट गृहाबाहेर आंदोलकांनी जय श्रीराम व शाहरूख खान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. तोफखाना पोलिसांनी आंदोलकांना प्रवेशद्वारावर रोखून परत पाठवले.
त्यानंतर आंदोलकांनी मध्य शहरातील आशा चित्रपट गृहाकडे मोर्चा वळवला. तेथेही कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रवेशद्वारावरच रोखले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व आंदोलकांना परत पाठवले. दरम्यान, शहरातील दोन्ही चित्रपट गृहामध्ये पठाण चित्रपटातील शो सुरळीतपणे सुरू आहेत.