Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगर...अन्यथा ईव्हीएम मशीन फोडू! 'घोटाळ्यामुळे देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे'

…अन्यथा ईव्हीएम मशीन फोडू! ‘घोटाळ्यामुळे देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे’

Ahmednagar News : आगामी लोकसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अन्यथा ईव्हीएम मशीन फोडण्याचा इशारा दिला आहे. तसेच या प्रकरणात निवडणूक आयोग देखील सत्ताधाऱ्यांना साथ देत असून, या घोटाळ्यामुळे देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे वळाली असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने करण्यात आला आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा, महानगरपालिकाच्या सर्व निवडणुका ईव्हीएम मशीनवर होणार आहे. ईव्हीएम मशीनवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. ईव्हीएम मशीन हॅक होण्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. तरी देखील सर्वच निवडणुका ईव्हीएम मशीनवरच घेतल्या जात आहे. त्यामुळे एकच पक्ष सातत्याने सत्तेत येत आहे.

ही बाब भारतीय लोकशाहीला घातक आहे. यामुळे देशात लोकशाही संपुष्टात येऊन हुकूमशाही आल्याशिवाय राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या मतमोजणीत ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन मधील चिठ्ठयांची केवळ १ टक्के मतांची तुलना करून निष्पक्ष, पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पाडू शकत नाही. दोन्हींची शंभर टक्के तुलना होणे आवश्यक आहे. निवडणुक काळात झालेल्या घोटाळ्यामुळे ईव्हीएम मशीनवरील जनतेचा विश्वास संपत चालला आहे.

देशातील अनेक राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी ईव्हीएम मशीनवर अविश्वास दाखवलेला आहे. विरोधातील तक्रारीवर निवडणूक आयोग संवेदनशीलता दाखवून दखल घेत नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments