Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरअंगणवाडीत कालबाह्य व निकृष्ट दर्जाचा पोषण आहार वाटप

अंगणवाडीत कालबाह्य व निकृष्ट दर्जाचा पोषण आहार वाटप

अहमदनगर : महाराष्ट्रात गरोदर स्त्रिया, स्तनदा माता व किशोरयीन मुलींना तसेच तीन वर्षापर्यंत च्या बालकांना वाटप करण्यात येणारा पोषणआहार हा फेडरेनकडून वाटप करण्यात येतो. गेल्या दोन महिन्यांपासून अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचा विविध मागण्यांसंदर्भात संप सुरु असल्यामुळे अंगणवाड्या बंद होत्या नुकताच त्यांचा संप मिटल्याने अंगणवाड्या सुरु झालेल्या आहेत . त्यामुळे नुकताच अंगणवाडी केंद्रामध्ये चार महिन्यांचा आहार पाठवला आहे.

यात अंगणवाडी केंद्रामध्ये मुदत संपलेल्या आहाराचे वाटप करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावात घडला आहे. याबाबत येथील सरपंच शरद पवार यांनी या गंभीर प्रकाराबाबत संबंधितांवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे केली आहे.

अंगणवाडीत वाटप करण्यात आलेल्या पोषण आहार पुड्यांवरील मुदत संपलेली आहे. तसेच सदर पुड्यांमधील पोषण आहार हा एकात्मीक बालविकास योजनेतील मार्गदर्शक तत्वांनुसार नाही. त्यात प्रोटीन, लोह, कॅल्शियम,थाईिमन, साखर शेंगदाणे असे अनेक घटकही समाविष्ठ नाहीत.

नुकत्याच वाटप केलेल्या आहाराच्या पाकीटावर आहार तयार केल्याच्या दिनांकापासून दोन महिने कालावधीत खाण्यासाठी योग्य आहे असे नमुद असताना देखील हा आहार कालबाह्य झाला असताना लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे. प्रत्येक अंगणवाडीत विद्यार्थी पालकांना वाटलेला आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या आहाराचे गावातील विविध अंगणवाड्यांमध्ये वाटप सुरु आहे. गावातील अनेक लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करून याची लेखी तक्रार देखील केलेली आहे. सदर आहाराची एक चिमूट जरी तोंडात टाकली तरी मळमळ व उलटी आल्यासारखे होते इतका हा निकृष्ठ आहार आहार आहे. त्यामुळे हा वाटप बंद करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments