अहमदनगर

संतापजनक घटना! तरूणाचा चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार

अहमदनगर- अंगणात खेळणार्‍या चिमुरडीला (वय 7 वर्ष) दुचाकीवरून एका मंगलकार्यालयात घेवून जात तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नगर शहरात समोर आला आहे. पीडितीच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादवरून युसूफ हमीद कुरेशी (वय 34 रा. काटवन खंडोबा, नगर)याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 

कुरेशी याने पीडितीवर अत्याचार करण्यापूर्वी तिला चार दिवस पाणीपुरी, चॉकलेट, चिप्सचे देवून आमिष दाखविल होते. फिर्यादी या मोलमजुरीचे काम करतात. त्यांची अल्पवयीन मुलगी शाळेत जाते. 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीनिमित्त शाळेला सुट्टी असल्याने फिर्यादी यांची मुलगी घरीच होती. फिर्यादी कामावर गेल्यानंतर युसूफ कुरेशी याने मुलीला दुचाकीवरून बसून तो कामाला असलेल्या एका मंगलकार्यालयात नेले.

 

त्या ठिकाणी युसूफने मुलीसोबत अनैसर्गिक कृत्य केले. याची माहिती मुलीच्या आईला समजतात त्यांनी इतर नातेवाईकांशी संपर्क केला. त्यांनी चाईल्ड लाईन संस्थेला माहिती दिली. चाईल्ड लाईनमधील अधिकार्‍यांच्या मदतीने पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button