अहमदनगर

संतापजनक! आईनेच अल्पवयीन मुलीला ठेवायला लावले परपुरूषाशी संबंध

अहमदनगर- कोपरगाव तालुक्यातील एका गावात संतापजनक घटना घडली आहे. ‘तू आता वयात आल्याने आपल्या समाजाची चालीरिती म्हणून तुला परपुरुषाशी संबंध ठेवावे लागेल’, असे म्हणून जन्मदात्या आईनेच आपल्या आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन (वय- १३) मुलीला परपुरुषाशी संबध ठेवण्यास भाग पाडले.

 

याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या एका नातेवाईकाने राहाता पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यासह मुलीच्या आई विरोधात अत्याचार, बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

 

१ सप्टेबर २०२२ रोजी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने तिला सांगितले की,’तू आता वयात आली आहे. आपल्या समाजाच्या चालीरिती प्रमाणे तुला परपुरुषाशी संबध ठेवावे लागतील’, तेव्हा या मुलीने आईला मला शाळा शिकायची आहे, माझे वय नाही, मी असे घाणेरडे काम करणार नाही, असे सांगून तिने आपल्या आईला विरोध केला.

 

त्यानंतर २ सप्टेंबर रोजी सकाळी आबासाहेब रामचंद्र भडांगे (रा. वेस, ता. कोपरगाव) हा घरी आला. तेव्हा तिची आई तिला म्हणाली, तुला याचेबरोबर संबंध ठेवावे लागेल. तेव्हा ती घरातून निघून गेली. त्या दोघांनी तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही.

 

६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी आबासाहेब रामचंद्र भडांगे पुन्हा पीडित मुलीच्या घरी आला. त्यावेळी पीडितेची आई पीडित मुलीला म्हणाली, याचेसोबत तुला शरीर संबंध ठेवावे लागेल. त्यास पीडित मुलीने विरोध केला असता पीडिताची आई तिला म्हणाली, आपल्या समाजामध्ये असे करावे लागते, मी सुध्दा हेच केले आहे. तू जर असे केले नाही तर तुझ्याकडे पाहावे लागेल, अशी धमकी दिली.

 

त्यानंतर आबासाहेब भडांगे याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला तिच्या आईच्या घरातील एका खोलीत घेवून गेला व तिचे इच्छेविरुध्द संबंध ठेवले.

 

आरोपीस पीडिताची आईने संगनमत करुन मदत केली. या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी आरोपी पीडिताची आई, तसेच आरोपी आबासाहेब रामचंद्र भडांगे यांचे विरुध्द भादंवि कलम ३७६ (२) (१) (जे), ५०६, ३४, बालकांचे लैंगिक शोषणापासून अधिनियम कायदा संरक्षण अधिनियम कलम ४, ६, १६, १७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन्ही आरोपींना राहाता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button